शिक्षक संघ व लायँस कल्बच्यावतीने शिक्षकांचा सत्कार

0
33

गोंदिया,दि.29ः- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदिया व लायन्स क्लब गोंदिया यांच्या संयुक्त विद्ममानाने “शिक्षक गौरव पुरस्कार व शिवाजीराव बडे लिखित “परमवीर चक्र( The Tiger’s of Indian Wor’s) ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा(दि.28) साई मंगलम लॉन गोंविन्दपूर रोड गोंदिया येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  तिरोड्याचे आमदार विजयभाऊ रहांगडाले होते.तर उदघाटक म्हणून लोकलेखा समितीचे अध्यक्ष व गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल हे होते.दिप्रज्जलन डायटचे प्राचार्य राजेश रूद्रकार यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, लिलाधर पाथोडे,कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे सभापती चिंतामण रहागंडाले, लॉयन क्लब अध्यक्ष सविता तुरकर,सचिव  राजेश्वर कनोजीया,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सुधाकर डोये,शिक्षण विस्तार अधिकारी ए. के. खडसे,प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेन्द्र कटरे,विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे,अनिरूध्द मेश्राम,उमाशंकर पारधी,केदारनाथ गोटाफोडे,यशोधरा सोनवाने,सूरेश रहांगडाले, नरेंद्र आगाशे तसेच प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्था जिल्हा गोंदियाचे उपाध्यक्ष शंकर नागपूरे,संचालक पवन कोहळे,शंकर चव्हाण व वाय. बी. पटले उपस्थित होते.
यावेळी गोंदिया तालुक्यातील 13 केन्द्रामधील उत्कृष्ट कार्य करीत असलेले 25 आदर्श शिक्षक व खमारी केंद्रप्रमुख अंजली ब्राम्हणकर यांना सन्मानपत्र व गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवान्वित करण्यात आले. प्रास्तविक तालुकाध्यक्ष योगानंद पटले ,संचालन हेमंत पटले यांनी केले.तर आभार विनोद लिचडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोरेश्वर बडवाईक,चंद्रशेखर दमाहे, गणेश चुटे,विनोद सुर्यवंशी,केशव मानकर,प्रविण नरुले,राजेंद्र निंबार्ते,जी. एच हरिणखेडे,आर. जी. मेश्राम,बी. वाय फुले, देवेंद्र जचपेले,सुनील सोनवाने,रेखा ठाकरे,गिता मेंढे,एस.पी. कुंभलकर,एम. आर. बोपचे,मोहन शहारे, वरुन दिप, एन. जे. डहाके, एन. जे. कटरे, निरंजन सोनकल्यारी, एच के पटले, श्रीधर पंचभाई, मुनेश्वर जैतवार, के. बी. नेवरे, वाय. बी. चावके, शैलेश गौतम, दुर्गेश रहांगडाले, सचिन वडीचार, संतोष तुरकर, ओ. बी. चौधरी, ओ. आय. रहांगडाले, आनंद मेश्राम, माणिक घाटघुमर, लोकेश कटरे, आर. एस. चव्हाण, विलास धकाते, व्ही एन. कोरे,भैय्यांलाल भोतमांगे, के. एल. कावळे, आर. एच. राऊत, डी. सी. रहांगडाले, एम. जी. हटिले, विष्णू तुरकर, अरुण राहुलकर, राजेश बिसेन, एच. डी. भेलावे, मधू मेंढे, आर जी हुमणे, संतोष टेंभरे, एस. डी. खोटेले, आर. आर. चौधरी, टी. एम. शहारे, सुनील चौरागडे, एस. एम. बिसेन, तुलशी कटरे, हर्ष पवार, एम. डी. फड, श्यामकुमार बिसेन, विरेंद्र कावळे, गणेश चव्हाण, एन. जे कटरे, जे. एस. कटरे, हेमराज पारधी, अरुण राहुलकर, राजेश बिसेन, के. के. पटले, हेमंत बिसेन, महेश कोरे, एम. एस. नांदगाये यांच्यासह इतर शिक्षकांनी केले.