24.8 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home शैक्षणिक बिरादारवस्ती(करजगी) शाळेमार्फत सुनील सुर्यवंशी यांचा सत्कार

बिरादारवस्ती(करजगी) शाळेमार्फत सुनील सुर्यवंशी यांचा सत्कार

0
28

(राजेभक्षर जमादार),जत,दि.13ः- लायन्स क्लब जत पुरस्काराने सन्मानित शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचा सत्कार जिल्हा परिषद कन्नड शाळा बिरदारवस्ती करजगी येथे नुकताच करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हिंदुस्थानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तर विशेष अतिथी म्हणून उमदी पोलीस स्टेशनचे ए पी आय भगवान शिंदे हे उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, पुणे विभागीय सचिव-प्रल्हाद हुवाळे,वरिष्ठ मुख्याध्यापक तुकाराम नाईक यावेळी उपस्थित होते.शिक्षक सुर्यवंशी यांना शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ,गुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक एपीआय भगवान शिंदे म्हणाले की,महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील या शाळेतील शिक्षकांचा गौरव करण्यात आला हे अतिशय चांगले असून शिक्षकांनी काळानुसार बदलेले पाहिजे. शिक्षकांना समाजात खूप मान व आदर आहे.माझ्या लहानपणीच्या शिक्षकांनी आम्हाला चांगले संस्कार केल्याने आम्ही घडलो.यावेळी एम.एस.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.संदीप पाथरुट यांनी आभार मानले.यावेळी बोर्गी केंद्रातील राजकुमार इमन्नावर ,सीताराम गौडी, भीमाशंकर शिंपी, प्रभाकर सलगार आदी शिक्षक शिंपी ,जनाब आदी उपस्थित होते

blank