23.8 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home शैक्षणिक सभापती भाग्यश्री आत्रामांच्या हस्ते तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनीचा शुभारंभ

सभापती भाग्यश्री आत्रामांच्या हस्ते तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनीचा शुभारंभ

0
30

गडचिरोली,दि.13ः- जिल्ह्यातील सिरोंचा येथे  १२, १३ आणि १४ डिसेंबर २०१८ रोजी पंचायत समिती शिक्षण विभाग सिरोंचाच्या वतीने तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन श्रीनिवास हायस्कुल अंकीसा येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी प.स. सभापती कमला बोडका गावडे होत्या. विशेष अतिथी म्हणून जि.प.सदस्या सौ.श्रीदेवी जयराम पांडवला, प.स.उपसभापती कृष्णमूर्ती रिकुला, मधुकरराव कोल्लूरी, गटविकास अधिकारी शेखर देशमुख,प.स.सदस्य प्रभाकर शंनगोंडा, जंपन्न दुर्गम,गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख , शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. रीतसर कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानतंर ताईंनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून मार्गदर्शनात प्रत्येक विद्यार्थी हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावे आणि डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवून देशासाठी सेवा करावी असे प्रतिपादन केले.सहभागी विध्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचे निरीक्षण करून त्यांच्या सोबत संवाद साधला. तसेच सहभागी विध्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्या दिल्या.

blank