१२ वीला २०,९०३ तर १० वीला २२२७८ विद्यार्थी बसणार परिक्षेला

0
15
गोंदिया,दि.६ः- माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्यावतीने फेबुवारी व मार्च महिन्यात घेण्यात येणाèया इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत गोंदिया जिल्ह्यातून २२२७८ व २० हजार ९०३ विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत.इयत्ता १० वी करीता ९९ तर १२ वी करीता ७३ परीक्षा केंद्र ठरविण्यात आले आहेत.या काळात ७ भरारी पथकही परिक्षा केंद्रावर भेट देण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत.या पथकामध्ये निरतंर,माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी,डायटचे प्राचार्य,विशेष महिला भरारी पथक,माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांचे पथक आणि जिल्हाधिकारी यांनी तालुकास्तरावर नेमलेल्या पथकांचा समावेश आहे.
इयत्ता १२ वी च्या परिक्षेत गोंदिया तालुक्यातील २२ परिक्षा केंद्रावर ६७१४ विद्यार्थी,आमगाव तालुक्यातील ७ परिक्षा केंद्रावर १९०४ विद्यार्थी,अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ८ परिक्षा केंद्रावर २३८८,देवरी तालुक्यातील ६ परिक्षा केंद्रावर १४६१,गोरेगाव तालुक्यातील ७ परिक्षा केंद्रावर २२४०,सडक अर्जुनी तालुक्यातील ७ परिक्षा केंद्रावर १७२१,सालेकसा तालुक्यातील ६ परिक्षा केंद्रावर १६२४ तर तिरोडा तालुक्यातील १० परिक्षा केंद्रावर २८५१ विद्यार्थी बसणार आहेत.
तर  इयत्ता १० वी च्या परिक्षेत गोंदिया तालुक्यातील २९ परिक्षा केंद्रावर ६९५८ विद्यार्थी,आमगाव तालुक्यातील १० परिक्षा केंद्रावर २२२२ विद्यार्थी,अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १० परिक्षा केंद्रावर २६७९,देवरी तालुक्यातील ९ परिक्षा केंद्रावर १९३८,गोरेगाव तालुक्यातील १० परिक्षा केंद्रावर २२४०,सडक अर्जुनी तालुक्यातील ९ परिक्षा केंद्रावर १८०४,सालेकसा तालुक्यातील ७ परिक्षा केंद्रावर १३१२ तर तिरोडा तालुक्यातील १५ परिक्षा केंद्रावर ३०८५ विद्यार्थी बसणार आहेत.या दोन्ही परिक्षा हाताळण्यासाठी तालुकास्तरावर परिरिक्षण केंद्रप्रमुख म्हणून गोंदिया शहर आर.पी.रामटेके,गोंदिया ग्रामीण महेंद्र मोटघरे,गोरेगाव एम.बी.लांडे,अर्जुनी मोरगाव निलकंठ शिरसाठे,सडक अर्जुनी के.वाय.सर्याम,आमगाव वाय.सी.भोयर,देवरी आर.एस.येटरे,सालेकसा एस.जे.वाघमारे आणि तिरोडाकरीता पी.बी.समरीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.