कमी पटसंख्येच्या शाळांच्या समायोजनास स्थगीती द्या-माजी मंत्री बडोले

0
44
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोर,दि.०८– गोंदिया जिल्ह्यातील शाळांच्या UDISE २०२३-२४ च्या स्थितीनुसार १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन नजीकच्या मोठ्या शाळेत समायोजन करा.या निर्णयाला स्थगीती देवुन जैसे थे ठेवण्यात यावे,अशा आशयाचे निवेदन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्याच्या शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांना देऊन प्रत्यक्ष परिस्थीतीची जाणीव करुन देत सविस्तर चर्चा केली.
विशेष म्हणजे दि.१२/४/२०२४ ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी पत्र काढुन २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा नजीकच्या मोठ्या शाळेत समायोजन करण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र दिले.
यात जिल्ह्यातील १८५ शाळा समाविष्ट आहेत.या शाळा अतिशय दुर्गम भागातील व बहुतांश आदिवासी ग्रामीण भागातील असल्याने सदर शाळा बंद झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होईल.त्यांना बाहेर जाण्याचा त्रास होऊन परीणामी त्यांचे शिक्षणात खोळंबा होईल याची जाणीव ठेवून सदर शाळा पुर्ववत सुरू ठेवण्यात यावे याबाबत माजी मंत्री‌ राजकुमार बडोले यांनी प्रधान सचिव यांच्या लक्षात सदर बाब आणून दिली.प्रधान सचिव कुंदन यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.