प्रोग्रेसिव्ह शाळेत सांस्कृतिक समारोह व महिला दिवस उत्साहात

0
21

गोंदिया,दि.16 : श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ शाळेतर्फे महिला सशक्तीकरण अभियाना योगदान प्रदान करीत अंतरराष्ट्रीय महिला दिवस प्रोग्रेसिव्ह इंटरनेशनल शाळेच्या प्रांगणात भव्य सांस्कृतिक समारोहच्या रूपात घेण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रतिभाशाली शिक्षा, चिकित्सा, मोटिवेशन, राजनितीक आणि सामाजिक कार्यकर्ता नारी शक्ति उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया मेडिकल कॉलेजचे असोसिएट प्रोफेसर डॉ. गरिमा बग्गा, इएनटी सर्जन डॉ. लता जैन, सविता पुराम, सामाजिक कार्यकर्ता सविता विनोद अग्रवाल, पार्षद भावना कदम, जि.प. सभापति शैलजा सोनवाने, धर्मिष्टा सेंगर, अश्‍विनी केंद्रे, समाज सेविका सविता बेदरकर, त्रिवेणी तुरकर, मोहिनी मुदलियार, नीला ढोक, डॉ. व्रजा गुरी, अल्का पंकज कटकवार, पद्मा निरज कटकवार, ज्योति पहिरे आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वती, सावित्रीबाई फुले, राजमाता जीजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या अधिकारांबाबद जागरूक राहिण्यासाठी आवाहन केले. दरम्यान शालेय विद्यार्थीनींना यात मानसिक शारीरिक सुदृढ, स्वसंरक्षण यात प्रशिक्षीण दाखविण्यात आले. तसेच नारी शक्ति प्रदर्शित करणारे समूहगीत व पथनाट्य प्रोग्रेसिव्ह शिक्षीकाद्वारे प्रस्तुत करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्याचे स्वागत व अभिनंदन भेट स्वरूप स्मृती चिन्ह देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्राचार्या कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, कुलदिप भौतिक, विणा कावळे, निधी व्यास, वर्षा सतदेवे, मिनाक्षी महापात्रा, रूपकला रहांगडाले, कल्याणी रहांगडाले, रिना शाहू, भनुलता लावेटी, कल्पना राव, अर्चना भोयर, दिव्यांशू जायस्वाल यांनी केले.