विवाह सोहळा काळाची गरज-खा.पटेल

0
19

भंडारा,दि.16ः- आजच्या महागाईच्या काळात सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे. यामुळे दोन्ही वैवाहिक कुटुंबीयांची पैशांची बचत व विवाह सोहळ्यात होणार्‍या त्रासापासून मुक्तता होते, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले. ते केशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्थेमार्फत मिशन हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात बोलत होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्याला पाहुणे म्हणून भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार मधुकर कुकडे, आमदार डाॅ. परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, रामलाल चौधरी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, रमेश डोंगरे,माजी आमदार सेवक वाघाये, नंदू कुझ्रेकर, नरेश डहारे,शिक्षण व आरोग्य सभापती धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, सदानंद इलमे, अरविंद भालाधरे, नीलकंठ कायते, सुभाष आजबले, के.झेड. शेंडे, नितीन कडव, राजकपूर राऊत, नितीन तुमाने, यशवंत सोनकुसरे, नरेंद्र झंझाड, उमेश मोहतूरे, यशवंत भोयर, सुरेश भूरे, सरिता डहारे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी अरविंद पडोळे, मनोज बोरकर, संजय सेलोकर, भोजराज येवले, शरद काटेखाये, पराग बोरकर, दिपक चिमनकर, विनोद ढोरे, संजय मडावी, वसंता लोंदासे, गजानन कळंबे, विजय बावनकुळे, रामलाल बावनकर, ताराचंद भूरे, संजय अहिरकर, मिथून बोरकर यांनी पर्शिम घेतले. आभार नरेश डहारे यांनी मानले.