गौरनगर येथे नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्राची स्थापना

0
11

अर्जुनी मोरगाव,दि.26 : गौरनगर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळेत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. या विज्ञान केंद्राचा लाभ कोरंभीटोला केंद्रातील विद्यार्थ्यांना होणार आहे.तथापि, जिल्हा परिषदेचे कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, एस.एस. कठाणे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बरईवार, शिवमल्हार टेक्नालॉजी प्रा. लि. चे प्रतिनिधी अभिजित झाडे, केंद्रप्रमुख सौ. एम.आर. वैष्णव, विज्ञान विषयतज्ज्ञ सी.जे. ढोक, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वनिता मंडल, लतिका सरकार, मुख्याध्यापक एम.एच. कोहाडकर, बी.एन. मंडल, पी.के. मंडल, जी. एन. सोनकुसरे, ए. ए. घरामी, आर.एम. मंडल, टी. पी. खऊल व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवर मंडळीने येणार्‍या दिवसात या विज्ञान केंद्राचा लाभ गौरनगर शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर जवळच्या केंद्रातील विद्यार्थ्यांना होणार असल्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बी. एन. मंडल यांनी केले तर आभार टी. पी. खऊळ यांनी मानले.