सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्‍यांनी नोंदविला प्रज्ञा सिंहचा निषेध

0
27

भंडारा,दि.26ः- महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत असभ्य विधान करणार्‍या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिचा महाराष्ट्र सेवानवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन भंडारा व पोलिस बॉईज असोसिएशन भंडारा यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्‍या ंमार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. हेमंत करकरे यांना मी दिलेल्या शापामुळे त्यांचा सर्वनाश झालेला असून, ते देशद्रोही होते, असे अशोभनीय वक्तव्य तिने केले आहे. ज्यांनी देशासाठी प्राणाची आहूती दिली, दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले, त्यांच्याबाबत असे उद्गार अतिशय निंदनीय आहे. हा देशासाठी शहीद झालेल्या जवानांचा अपमान करणे होय. या वक्तव्याचा महाराष्ट्र पोलीस सेवानवृत्त अधिकारी कल्याणकारी असोसिएशन भंडारा व पोलीस बॉईज असोसिएशन भंडाराच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले. निवेदन देताना महाराष्ट्र पोलीस सेवानवृत्त अधिकारी कल्याणकारी असोसिएशनचे मार्गदर्शक पुंडलिकराव निखाडे, अध्यक्ष डि. बी. ईलमकर, उपाध्यक्ष गजानन भोवते, सचिव जयदेव नवखरे, सहसचिव नंदकिशोर माहूर्ले, कोषाध्यक्ष धनराज कोचे, अरविंद मेर्शाम, प्रमिला तिरपुडे, मोतीलाल बोरकर, रवी लांजेवार, नारायण माकडे, भाऊराव कोचे, अरविंद कानेकर, अमरसिंह राठोड, भाऊराव बन्सोड, अरविंद पोटभरे, सईद शेख, मनोरमा बन्सोड, रमेश हिवराळे, ईश्‍वर शेंडे, रामभाऊ अहिर, डहाके, ईश्‍वर बोंद्रे, जनार्दन निंबार्ते, लांजेवार, दिवाकर मेहर, लियाकत खान, पोलिस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष जैराम बावने, सिंधू मडावी, ठाकूर, जया हिंगणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.