विद्यार्थी केंद्रित कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज-जिल्हाधिकारी रमेश घोलप

0
37

सोलापूर,दि.28ः- जिल्ह्यातील निर्मिती बहुउद्देशीय शिक्षण संस्था बावी(आ) संचालित स्पर्धाविश्व शैक्षणिक संकुल क्लासेसचे उद्घाटन झारखंड राज्यात कार्यरत असलेले जिल्हाधिकारी रमेश घोलप(भा.प्र.से )यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व पुस्तकपुजन करून करण्यात आली.उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी घोलप म्हणाले की, औपचारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थी केंद्रित कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आवड व छंद ही जोपासावेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा अतीतान न घेता हसत खेळत शिक्षण पुर्ण करून आपले इच्छित ध्येय साध्य करावे.विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या अश्या संकुलांना पालकांनी पाठबळ द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी उमेश घोलप (अध्यक्ष, उमेद प्रतिष्ठान बार्शी ) दिपक गुंड ( प्राचार्य,श.नि.अध्यापक विद्यालय) रुपाली काळे ( पोलीस उप निरीक्षक) सागर लोखंडे , गणेश आगलावे ( अध्यक्ष, जय हनुमान व्यायाम प्रसारक मंङळ) बाळासाहेब ढेंबरे ( शिक्षण तज़्ज्ञ) अस्मिता चिपङे ( संचालिका स्पर्धाविश्व )विशाल चिपङे ( जागर फाऊंडेशन ) आदी मान्यवर व पालक विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रेणुका बारगजे यांनी केले. तर सूत्रसंचालन गायत्री शेळके यांनी केले.