कारंजा शाळेच्याविद्यार्थ्याचे नवोदय प्रवेश परीक्षेत सुयश

0
13

गोंदिया,दि.२८: नुकताच झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षा २०१९ मध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कारंजा येथील विद्यार्थी आर्यन संजय भांडारकर याने घवघवीत यश संपादन करुन नवोदय विद्यालय प्रवेशाकरिता पात्र ठरला. त्यांनी त्याच्या निवडीचे श्रेय आई-वडील, अमुख्याध्यापक, वर्ग शिक्षक व सर्व शिक्षकांना दिले. या यशाचू दल घेवून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ वेवून विद्याथर्यांचे अभिनंदन केले व पुढील भविष्याासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रामुख्याने जिवनेश मिश्रा, महेंद्र मोटघरे, खडसे, विजय ठोकणे, कैलास खोब्रागडे, एन.बी.कटरे गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशे, नरेश बडवाईक, एल.यू.खोब्रागडे, एम.टी.जैतवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आर्यनचे कौतुक केले.