रविंद्र विद्यालयाचा हर्ष नवोदय विद्यालयातील परिक्षेत अव्वल

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगाव,दि.29ः-तालुक्यातील रविंद्र विद्यालय चोपा येथील वर्ग ५ चा विद्यार्थी हर्ष प्रकाश सोनकनेवरे जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिक्षेत अव्वल मार्क घेऊन उत्तीर्ण झाला. यासाठी मिडल स्कूल च्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना अधिकच्या तासिका घेऊन नवोदय परिक्षेचे धडे दिले. त्यामुळे परिसरात रविंद्र च्या शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकाची प्रशंसा केली जात आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात त्याची निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने रविंद्र विद्यालयात आई वैशाली वडील प्रकाश व विद्यार्थी हर्ष सोनकनेवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक ओ.बी.शेन्डे, प्रा.ए.जे.मेश्राम, सी.एस. कोल्हे, पी.सी.ताराम, के.टी.मसराम यांनी सत्कार केला.
रविंद्र विद्यालयात वर्ग ५ मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना नवोदय परिक्षा देण्यासाठी तयार करून त्यांची वर्षाच्या शेवटी परिक्षा घेण्यात येते ही बाब लक्षात घेऊन येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवोदय चे धडे देऊन तयार केले. शाळेतील २0 विद्यार्थ्यांना तयार करण्यात आले. यात १विद्यार्थी यशस्वी झाला. हर्षने यशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना दिले.