पहिल्या दिवशी होणार विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन शाळा प्रवेशोत्सव 

0
7
गोंदिया,दि.25: नव्या शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. २६ जून रोजी शाळा सुरू होत असून या कार्यक्रमाची पूर्वतयारी आदल्या दिवशीच पूर्ण केली जाणार आहे. शाळेत येणाऱ्या विद्याार्थ्यांचे कोतुक व्हावे, त्यांचा उत्साह व्दिगुणीत व्हावा यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रवेशपात्र बालकांची यादी ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येईल, ध्वनिप्रक्षेपकावर उद्या आपल्या सर्व बालकांना सकाळी शाळेत पाठविण्याची विनंती करण्यात येईल. प्रवेशपात्र बालकांची यादी घोषित करणे, गाव किंवा वॉर्ड मोठा असल्यास दोन किंवा तीन शिक्षकांचा गट तयार करून गृहभेटी, शैक्षणिक पदयात्रा काढून गावातील प्रत्येक घरापयंर्त पोहोचायचे आहे. गावातील युवक, गावकरी, बचतगटाचे सदस्य यांची मदत घेऊन शाळा परिसर स्वच्छ करणे, सडा शिंपून रांगोळी काढणे, आंब्यांच्या किंवा उपलब्ध असलेल्या पानफुलांची तोरणे बांधून, ध्वनिक्षेपकावर देशभक्तीपर गीते वाजविण्यात येतील. २६ जून या शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वांनी शाळेत उपस्थित राहावे, शाळेच्या पूर्वदिनी ज्या प्रवेशपात्र बालकांना प्रवेश दिला आहे त्यांची घोषणा करावी. उर्वरित प्रवेशपात्र बालकांची नावे ध्वनिक्षेपकावरून घोषित करावी. तत्काळ प्रवेश घेण्याचे आवाहन पालकांना करण्यात येईल. गावात देशभक्तीपर गीते गाऊन नारे देत बालकांची प्रभातफेरी काढण्यात येईल, युवक, गावकरी ज्येष्ठ नागरिकांना प्रभातफेरीमध्ये सहभागी होतील. पुस्तकदिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत सर्व बालकांना मोफत पाठ्ययपुस्तके वितरित करून पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या बालकांचे फुले देऊन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात येईल. वर्षभर शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देऊन एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही याची सर्वांना प्रतिज्ञा देण्यात येईल, असे नियोजन आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असून प्रत्येक शाळांनी हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे..