मडेघाटातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाचा सेवानिवृत्ती सत्कार

0
27
लाखांदुर,दि.02 : विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना सातत्याने प्रोत्साहित करून,त्याकरिता स्वतःच्या कुटुंबाच्या वाट्याचे श्रम, पैसा व वेळ विद्यार्थ्यांच्या पदरात टाकून त्यागपूर्ण समर्पित सेवा करून,  दिशादर्शन केलेले आपले विद्यार्थी आपल्या कार्याचा ठसा त्यांच्या क्षेत्रातून उमटवतील तेव्हा शिक्षकांनी केलेले कष्टाचे दृगोच्चर होत राहतील , असे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सुरेश भोवते यांनी केले आहे.
 ते स्वत:च्या सेवानिवृत्ती सत्कार समारोहा प्रसंगी बोलत होते.लाखांदुर तालुक्यातील मडेघाट येथील जि. प. प्राथ. शाळा येथे १ जुलै रोजी पार पडला.  सुरेशजी भोवते यांचा आईसमवेत सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला सविता भुते,ज्ञानेश्वर खंडाते,विनोद जांभुळकर,सुमनताई रामटेके,भाग्यश्रीताई बेदरे,सुमनताई ठाकरे,हिरकण्याताई सुखदेवे,सुरेखाताई कोरडे,वणमलाताई सुखदेवे,सुरेखाताई कोरडे,उर्मिलाताई गडे,ग्रामसेविका अंबादे,कडूजी अलोने,मारोती लांडगे,श्रावण दखणे,गोविंदा  मेश्राम,दयाराम तोंडरे,अंताराम ठाकरे,सुनील बारसागडे,दयाल भोवते,संजय भोवते,सुरेश लंजे यांच्या उपस्थितीत पार पडला. मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेतील संपुर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावातील संपुर्ण नागरीक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.