दवनीवाड्याच्या ११ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

0
14

गोंदियाŸदि.०९ : शैक्षणित सत्र सुरू होण्यापासून ते काल आजपयंर्त शिक्षण विभाग सर्व शिक्षकांना वेळेवर शाळेत उपस्थित रहावे, अशा सूचना करीत आहे. मात्र, शिक्षण विभागांच्या सुचनाकडे दुर्लक्ष करून शाळेत उशिरा पोहोचण्याचा प्रकार थांबेना, असे दवनीवाडा येथील जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आकस्मिक भेटीदरम्यान खंडविकास अधिकाèयासह पदाधिकाèयांनी खुद्द अनुभवला. शुक्रवारला गोंदियाचे खंडविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी केंद्र प्रमुख व कर्मचाèयांसह जिल्हा परिषद शाळेला आकस्मिक भेट दिली. दरम्यान सर्व विद्यार्थी उपस्थित झाले असतानाही ११.४५ वाजेपर्यंत ११ शिक्षक शाळेत पोहोचले नव्हते. त्यामुळे उशिरा येणाèया त्या ११ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात २७ जून पासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. विद्याथ्र्यांचा शैक्षणिक दर्जा, भौतिक सोयी सुविधा, विद्याथ्र्यांचे संरक्षण आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षकांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, अशा सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हेतर जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर बैठका घेवून सर्व शालेय प्रशासनाला शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी उपस्थित रहावे, अशाही सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षण विभागाच्या सुचना व नियमांकडे दुर्लक्ष करून कर्तव्याला बुट्टी मारणाèया शिक्षकांच्या सवयीमध्ये कसलाही फरक पडताना दिसून येत नसल्याचा प्रकार दवनीवाडा जिल्हा परिषद शाळेत अधिकारी व पदाधिकाèयांनी खुद्द अनुभवला. गोंदियाचे खंडविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी कर्मचाèयांसोबत जिल्हा परिषद शाळेला ५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी पोहोचले. मात्र, एकही शिक्षक उपस्थित झाला नव्हता. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर खंडविकास अधिकाठयांनी आपल्या कर्मचाèयासह शाळेत ठाण मांडले. ११.४५ वाजतापर्यतही शाळेतील ११ शिक्षक उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे खंडविकास अधिकारी यांच्यासह सर्व कर्मचारी व पदाधिकाठयांच्या उपस्थितीत शालेय प्रार्थना घेण्यात आली. यानंतर ते ११ शिक्षक शाळेत पोहोचले. यावरून संतापलेल्या अधिकारी, कर्मचाèयांनी त्या शिक्षकांच्या चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. दरम्यान शिक्षण विभागाकडून त्या ११ शिक्षकांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यावेळी खंडविकास अधिकाèयासोबत वेंष्ठद्र प्रमुख मनोज दिक्षीत, सरपंच नरहरीप्रसाद मस्करे, विस्तार अधिकारी श्रीमती अग्रवाल, बोदेले, तंमुस अध्यक्ष सुर्यवंशी उपस्थित होते.