मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विध्यार्थ्यांचा सत्कार

0
6

गोरेगाव,दि.15ः-.. मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव मध्ये राज्य स्तरावर आयोजित महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक आर.डी. कटरे, प्राचार्य सी.पी.मेश्राम, शाळेतील इतर कर्मचारी याच्या हस्ते प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धाचे निरंतर आयोजन करण्यात येते. आर.डी. कटरे यांनी विध्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षावर मार्गदर्शन केले व अशा प्रकारच्या सर्व परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले.