गोंदिया,दि.27ःशालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाचे महत्व रुजावे, संविधानाने त्यांना दिलेले अधिकार व हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी २६ नोव्हेंबर हा संविधान साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिपचे समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांच्या संकल्पनेतून जिप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने यावर्षी शालेय विद्यार्थ्यांनी निबंध स्पध्रेचे आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील ९ हजार ७३१ विद्यार्थी सहभागी झाले.
देशाचे संविधान हे लोकशाही कणा आहे. संविधानाने नागरिकांना त्यांचे अधिकार व हक्क मिळवून दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही संविधानाचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या विषय समितीच्या बैठकीत जिप सभापती विश्वजीत डोंगरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले होते. आज, २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील २९ परीक्षा केंद्रावरुन तीन गटातील ९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. गोंदिया तालुक्यात ४ तर इतर सात तालुक्यात ३ परीक्षा केंद्र राहणार आहेत. संविधान दिनी, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते २ वाजतादरम्यान या निबंध स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. ‘अ’ गटातील इयत्ता पहिली ते आठवीसाठी ‘संविधान दिनामध्ये युवकांची भूमिका’ हा विषय व २00 शब्दमयार्दा होती. ‘ब’ गटात इयत्ता नववी व दहावीसाठी ‘भारतीय संविधान मुलभूत कर्तव्य व अधिकार’ हा विषय व ४00 शब्दमयार्दा व ‘क’ गटात इयत्ता अकरावी व बारावीसाठी ‘लोकशाही संवर्धनात (रक्षणार्थ) भारतीय संविधानाचे महत्व’ हा विषय व ५00 शब्दर्मयादा होती. तीनही गटातील ही स्पर्धा प्रत्येकी २५ गुणांची घेण्यात आली. विद्यार्थ्यांना निबंध मराठी, हिंदी व इंग्रजी यापैकी एका भाषेतून देण्याची सुविधा देण्यात आली होती. परीक्षेदरम्यान सर्व गटशिक्षणाधिकरी व गटविकास अधिकारी परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
एकूण तीन गटात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत
‘अ’ गटातून ४ हजार ६५३, ‘ब’ गटात २ हजार ८५0 व ‘क’ गटातून २ हजार २२८ अशा ९ हजार ७३१ विद्यार्थी सहभागी झाले. यात गोंदिया तालुक्यातील जिप शाळा दासगाव, रजेगाव, एकोडी, कामठा व शहरातील मारवाडी शाळा, गर्ल्स हायस्कूल या परीक्षा केंद्रावर २ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गोरेगाव तालुक्यात र0वद्र विद्यालय चोपा, रामकृष्ण विद्यालय चोपा व शहीद जाम्या तिम्या विद्यालयातून १ हजार २५६, आमगाव तालुक्यात जिप शाळा तिगाव, ठाणा, अंजोरा, कातुर्ली, कालीमाटी, चिरचाळबांध, कट्टीपार व आमगाव शाळेतून १ हजार ६५६, देवरी तालुक्यात जिप शाळा लोहारा, चिचगड व देवरी शाळेतून ७६२, सालेकसा तालुक्यात शहीद मिर्शा विद्यालय, कावराबांध व साकरीटोला शाळेतून ५६९, अजुर्नी मोर तालुक्यात जिप शाळा केशोरी, नवेगावबांध व अर्जुनी मोर शाळेतून १ हजार १00 व सडक अर्जुनी तालुक्यात आदिवासी विकास शाळा खजरी व जिप शाळा सडक अर्जुनी येथील परीक्षा केंद्रावरुन ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.




