29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home शैक्षणिक पी.डी.रहागंडाले विद्यालयात मार्गदर्शन वर्ग उत्साहात

पी.डी.रहागंडाले विद्यालयात मार्गदर्शन वर्ग उत्साहात

0
28

गोरेगाव,दि.17ः-येथील पी.डी.राहंगडाले विद्यालय व कन्या कनिष्ठ महा. गोरेगाव  येथे युनेष्को व मराठी विज्ञान परीषद गोदिया विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आवर्त सारणी चे आंतरराष्ट्रीय वर्ष” या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन वर्गाचे आयोजन (दि.16) करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील अविनाश सेनाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक वाय. आर. चौधरी हे होते. कार्यक्रमाला इ. 10 वी चे 90 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ए.एच.कटरे यांनी केले. कार्यक्रमाला सौ.एम डी राहंगडाले , सौ.व्ही पी कटरे यांची उपस्थिती होती.