सालेकसा,दि.05ः- तालुक्यातील झालिया वेंâद्रातंर्गत येत असलेल्या पोवारीटोला जि.प.हिन्दी वरिष्ठ प्राथमिक शाळेची इमारत जिर्णावस्थेत आली आहे. इमारतीच्या स्लॅबचे मलबा तुकड्यातुकड्याने पडू लागला आहे. तरीही चिमुकली जीव मुठीत घेवून जीर्ण इमारतीत ज्ञानार्जन करीत आहेत. असे असले तरी शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने पालक व विद्याथ्र्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील पोवारीटोला येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता १ ते ७ वी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत विद्याथ्र्यांसाठी फक्त ४ वर्गखोल्या आहेत. त्यापैकी दोन वर्गखोल्या पडक्या अवस्थेत आहेत. फक्त दोनच वर्गखोल्या सुस्थितीत असून विद्याथ्र्यांना ज्ञानार्जनासाठी पर्याप्त व्यवस्था नाही. त्यामुळे मोडकडीस आलेल्या इमारतींच्या वर्गखोल्यांमध्ये नाईलाजाने शिक्षक व विद्याथ्र्यांना जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. दोन्ही वर्गखोल्यांचे स्लॅब ठिकठिकाणाहून उखडलेले आहेत. केव्हाही स्लॅबचा मलब्याचे तुकडे खाली पडतात. तसेच दोन्ही वर्गखोल्यांची फ्लोरिंग उखडलेली आहे. वर्गात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. दरवाजे व खिडक्या तुटलेल्या आहेत. या बाबीची दखल घेत शिक्षण विभागाकडून जि.प.ला वर्गखोल्या दुरूस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले





