सडक अर्जुनी,दि.29ः तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलेनगर येथे शाळा व ग्रामवासीच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अर्जुनी मोरगाव क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांच्या हस्ते पार पडले.स्नेहसंमेलनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना चालना मिळते व बालक पालक आणि शाळा यांच्यात आपुलकी निर्माण हौऊन गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त ठरते असे मनोगत आमदार चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर होते.प्रमुख पाहुणे म्हणुन निशांत राऊत, वंदना डोंगरवार, देवाजी बनकर , सुरेखा झिन्गरे, अशोक लान्जेवार , ओमेश कापगते , आशिष येरने, पांडूरंग बनकर , धनिराम बनकर ,सूर्यभांण तोरणकर , दुर्योधन मंदाळे, प्रमिला चोपकर, रमेश बनकर , प्रमिला तोरणकर , नलू मंदाळे , डुलन मंदाळे , उपस्थित होते.स्नेहसंमेलन निमित्त विविध संस्कृतीक कार्यक्रम, महिला मेळावा, व रक्तदान शिबिर व सामुहिक गावभोजन चे आयोजन करण्यात आले होते.सदर महिला मेळावा कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुर्हे, केंद्रप्रमुख जी.जे. कापगते,जी.आर.गायकवाड,पी.एन. बड़ोले,आय.ए. दूधकनोज,एम.एस.डोंगरे,टी.जी.तुरकर,एच.एन. परशुरामकर, हुमेन्द्र चंदेवार उपस्थित होते.लोकसहभागातून भव्य दिव्य सजावट, संगीतमय आर्केस्ट्रा, सामुहिक गाव भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.यशस्वितेसाठी मुख्यध्यपाक किशोर डोंगरवार, सूभांगी रामटेके स शि , मीरा बनकर , पांडूरंग बनकर , दिपक बारस्कार, राधेश्याम भोंडे , सूर्यभाण तोरणकर , सुभाष तोरणकर, हुमकारेश्वर बनकर , युवराज बनकर , सतीश बनकर , खेमा मांदळे, अवि मंदाडे , सुनील मोहुले , ज्योती मोहुरले, गंगाधर मांदाडे ,सूरज मांदाडे, चंद्रशेखर चोपकर, विलास मंदाळे , जयेंद्र मंदाळे , रुपनाथ बनकर ,एकनाथ मंदाळे , मुकेश बनकर , राजेश बनकर, राधा भोंडे, यांनी परिश्रम घेतले.





