भंडारा,दि. 29:- 25 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसिल कार्यालय यांचे विद्यमाने भंडारा येथे साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता गांधी चौक ते शिवाजी क्रीडा संकल पर्यत रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत नुतन कन्या विद्यालय, भागीरथा भास्कर, मौलाना आझाद विद्यालय, राष्ट्रीय विद्यालय, भंडारा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिवाजी क्रीडा संकुल येथे निवडणूकीबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर नुतन कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी निवडणूक जागृतीबाबत पथनाट्याचे सादरीकरण केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून रोख रुपये 3 हजार व ट्रॉफी देवून गौरव करण्यात आला.
सकाळी 10 वाजता सामाजिक न्याय भवन भंडारा येथे राष्ट्रीय मतदार दिवस या विषयाशी संबंधीत रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जवळपास 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नवतरुणामध्ये जागरुकता निर्माण व्हावी व सर्व 18 वर्षावरील मुलांनी मतदानामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
चित्रकला स्पर्धेमध्ये आर्या धाबेकर हिला प्रथम पारितोषिक रुपये 2 हजार, तसेच द्वितीय साक्षी पांडे हिला रुपये 1 हजार 500 रुपये व तृतीय क्रमाक जान्हवी निनावे व दिप्तीका बावणकर 1 हजार रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच ऋणाल खोब्रागडे, आशिष पराते, जया बारापात्रे, खुशबु खोब्रागडे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक रोख रुपये 500 व प्रमाणपत्र देवून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे रांगोळी स्पर्धेमध्ये कशिश गौरी, अनुष्का नंदनवार व पूर्वा शेंडे नुतन कन्या विद्यालय भंडारा यांना प्रथम पारितोषिक रुपये 2 हजार, द्वितीय पारितोषिक समीक्षा जवंजार यांना रुपये 1 हजार 500 रुपये व तृतीय पारितोषिक तेजस्वी बारस्कर, साक्षी मांढरे, रेणूका गभणे यांना रुपये 1 हजार ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच अपूर्वा ईश्वरकर, समीक्षा चुटे, समीक्षा कोसरे, शेजल सार्वे, मारोती उमेश डोंगरे, रंजी बर्वे यांना प्रोत्साहनपर रोख रुपये 500 व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी सपर्धेत सहभाग घेतला होता त्या सर्वांना प्रमाणपत्र देवून गोरविण्यात आले.




