सीबीएसईमध्ये नुपूर कटरे सुयश

0
8

गोंदिया दि.२९–: केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावी बोर्डाचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आला. बारावीपाठोपाठ या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल घसरला असून,तो ९७.३२ टक्के लागला आहे. तर बारावीप्रमाणे दहावी निकालामध्येही तिरूअनंतपुरम् विभागाने बाजी मारली असून, या विभागाचा निकाल ९९.७७ टक्के लागला आहे. चेन्नई विभागाचा निकाल ९९.०३ टक्के लागला आहे.सीबीएसई बोर्डामार्फत २ ते २६ मार्चदरम्यान बोर्ड बेस्ड आधारित स्कीम २ परीक्षा तर १० मार्चपासून पुढील काळात स्कूल बेस्ड आधारित स्कीम १ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला देशभरातून १३ लाख ६९ हजार ८७ विद्यार्थी बसले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३.३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.गुरुवारी जाहिर झालेल्या निकालात गोंदिया पब्लीक स्कुलची विद्यार्थीनी नुपूर अजय कटरे हिने 90 टक्केच्या वर गुण प्राप्त करुन यश पटकावले आहे.नुपूरचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.