36.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home शैक्षणिक सिलेगाव जि.प.शाळेत महिला दिनानिमित्त सामान्य ज्ञानस्पर्धा

सिलेगाव जि.प.शाळेत महिला दिनानिमित्त सामान्य ज्ञानस्पर्धा

0
92

गोरेगाव,दि.08ः-तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सिलेगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त शालेय स्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा घेण्यात आली. आपल्या जिवनात स्पर्धेचे महत्व काय असते हे सहाय्यक शिक्षक सुंदरसिंग साबळे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.मार्गदर्शक कमलेश मेश्राम तर संयोजक टी.वाय.भगत हे होते.परीक्षेला उपसरंपच छगनलाल सेऊतकर यांनी भेट देत शाळेत राबवीत असलेल्या उपक्रमाबदल समाधान व्यक्त केले.या स्पर्धेत वर्ग 4 थी पासून ते 8वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या सर्व विद्यार्थ्यांना वर्गनिहाय बक्षिस देण्यात येणार आहे.आयोजनासाठी के.जी.मेश्राम,आर.साबळे,आर.वाय.डहाके,टी.वाय.भगत,यू.डी.चकोले यांनी सहकार्य केले.