४९९ बालके कुपोषणाच्या विळख्यात

0
12

भंडारा-

महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन चालविण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडीतील ४९९ बालके तीव्र कमी वजनाच्या क्षेणीत आहेत.एकात्मिक बाल विकास सेवा योजना गेल्या तीन दशकाहून अधिक काळापासून राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे मुलांच्या विकासात लक्षणीय सुधारणा झाली असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पण तरी देखील कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण बाल पोषण पद्धतीमध्येच व्यापक बदल होणे गरजेचे आहे.

आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी बालविकास प्रकल्प विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार महिला व बाल विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ० ते ६ वर्ष वजन घेतलेल्या बालकांची संख्या ८६ हजार ३८३ असल्याची नोंद आहे. यातील तीव्र कमी वजन गटात मोडणारी बालके ४९९ आहे. साधारण श्रेणीत ८२ हजार ५६८ बालकांचा समावेश आहे. कमी वजन गटातील बालकांचा आकडा ३ हजार ३१६ आहे. यात सर्वाधिक तीव्र कमी वजनाच्या क्षेणीतील बालके ही भंडारा तालुक्यात असल्याचे समोर आले आहे.