नवतेजस्विनी प्रकल्पाअंतर्गत होणार 44 गावातील दूध संकलन

0
15
  • माविम व हल्दीराम संयुक्त बैठक संपन्न

भंडारा, दि. 16 : नवतेजस्विनी प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील 44 गावातील दूध संकलन करण्यात येऊन ते हल्दीराम कंपनीला पुरविण्यात येईल. बचत गटांच्या महिलांना हक्काचा रोजगार स्थानिक रित्या उपलब्ध होईल या अनुषंगाने माविम व हल्दिराम यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीस हल्दिरामचे दुग्ध विभाग प्रमुख शेखर पालांदुरकर, तुमसरे दूध डेअरीचे संचालक विनोद तुमसरे, माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदिप काठोडे यांच्यासह लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक व उपजिविका सहयोगिनी उपस्थित होते.

यावेळी जिल्हयातील 44 गावात 844 पशुपालकांना माध्यमातुन दूध संकलन केंद्र सुरु करण्यात येत असुन प्रति केंद्र 200 लिटर दूध संकलित करून नियमितपणे पुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे श्री. काठोडे यांनी सांगितले दूध संकलना सोबतच माहे मार्च 2023 पर्यंत 68 नविन  दूध संकलन केंद्र सुरू करण्यात येतील. या दुधाचे संकलन हल्दीराम कंपनी द्वारे होईल. रोज 80 हजार लिटर व त्यापेक्षा अधिक दूध संकलन केले जाणार असून याकरिता  तुमसरे डेअरीच्या वाहनाव्दारे गावागावातुन दूध संकलित केले जाईल.  दूध संकलन सोबतच महिलांनी अन्य उपक्रम जसे शेळीपालन, डाळीच्या फ्लेक्सची मशीन, तथा अन्य उत्पादन जिल्हा प्रशासनाच्या आर्थिक सहाय्याने सुरु करावे.

उत्कृष्ट दर्जाचे दूध निर्मितीकरीता माविमच्या महिलांना हल्दीराम कंपनीने प्रशिक्षण द्यावे. याप्रसंगी हल्दीराम माविमला सर्व सहकार्य करेल तसेच त्वरीत कामाला सुरवात करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.