३00 शेतकर्‍यांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण

0
12

गडचिरोली-जिल्ह्यातील शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने गडचिरोली पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्याचे उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलग्रस्त क्षेत्रातील शेतकर्‍यांना अत्याधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड प्रशिक्षण देवून त्यांना विविध प्रकारचे कृषी साहित्य तसेच बि-बियाणे वाटप करण्याकरिता आज १ नोव्हेंबर रोजी भाजीपाला लावगड प्रशिक्षण व साहित्य वाटप मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळावा पोलिस दल व केंद्र/कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोनापूर यांचे संयुक्त आयोजित केला होत. या मेळाव्यात नक्षलग्रस्त भागातील ३00 शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती, शेतकरी व इतर जनतेनी पोलिस दलाच्या या उपक्रमाचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे, असे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अत्याधुनिक शेतीचे ज्ञान घेऊन व दज्रेदार पद्धतींचा अवलंब करून, त्याबाबतची सर्व माहिती संकलीत करून आपला विकास करावा. जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी सर्वातोपरी मदत केली जाईल, असे म्हणाले. तसेच नक्षल्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता पोलिस दलाच्या सहकार्याने स्वत:चा व जिल्ह्याचा विकास साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.
मेळाव्याला अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे, संचालक केंद्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूरचे डॉ. दिलीप घोष, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कर्‍हाळे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष मुरकुटे, डॉ. नरेश मेर्शाम, उपस्थित होते.