27.7 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home रोजगार/व्यापार लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स एंड एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून रोजगाराची संधी-अमृता फडणविस

लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स एंड एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून रोजगाराची संधी-अमृता फडणविस

0
3

गडचिरोली :लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स एंड एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात असून एवढ्या मोठा उदार मनाचे उद्योजक आपण पहिल्यांदाच बघत आहोत.लायडसचे प्रभाकरणजी यांचे काम मी कोरोना काळापासून बघत आहे.लाडसंने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उच्च शिक्षण आणि आरोग्याची सेवा देण्याकरीता रुग्णालय सुरु केल्याचे आपण हेडरीला बघितल्याचे समाजसेविका अमृता फडणवीस यांनी सांगितले.त्या पुढे म्हणाल्या.सावित्रीबाई फुलेनी शिक्षणाची ज्योत लावली ती ज्योत लॉयड्सच्या मुली पुढे नेत आहेत. हा विकास महिला सक्षमीकरणाचा आहे याचा मला अभिमान वाटतो. आज गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्हयाचा खरा विकास होत आहे. देशाची प्रगती खऱ्या अथनि खेळ्यापासुनच होते हेच मिशन घेऊन प्रभाकरण कार्य करीत आहेत.
लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स एंड एंटरप्रेन्योरशिपच्यावतीने बोदली येथे दिक्षांत कार्यक्रम मुख्य अतिथी म्हणून अमृता फडणविस उपस्थित होत्या.दीक्षांत समारोहाला प्रमुख अतिथी संचालक बि. प्रभाकरण,लोकप्रतिनिधी अरविंद सावकार पोरड्डीवार,संचालिका किर्ती रेड्डी, अल्का अरोरा, व्यांकटेशजी आदिची उपस्थिती होती.आपल्या प्रास्ताविक भाषणातून बि प्रभाकरण यांनी सांगीतले की लॉयड्स एड मेटल हि गडचिरोली जिल्हयातील संस्था असुन या संस्थेतुन रोजगार मिळावा म्हणुन या संस्थेद्वारे १० हजार युवक – युवतींना प्रशिक्षण दिले जाते.इथेच शिकायच व रोजगारांसाठी बाहेर पडायच हाच संकल्प घेऊन आजच्या घडीला ३०० विध्यार्थी निशुल्क प्रशिक्षण पूर्ण केले असुन पुन्हा ७०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षणार्थी उद्याचा सक्षम भारत घडविणार आहेत यात शंकाच नाही असे प्रास्ताविकातून प्रभाकरण यांनी सांगितले.