गुरू जगात थोर,उघडून देतो ज्ञानाचे दार, गुुरु ज्ञानाची खाण,गुरु देवाहून महान‘

0
26

५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गुरू जगात थोर,उघडून देतो ज्ञानाचे दार,
गुुरु ज्ञानाची खाण,गुरु देवाहून महान‘

आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस संपूर्ण भारत देशात ङ्कशिक्षक दिनङ्क म्हणून साजरा केला जातो.आपल्या भारतात कोट्यवधी शिक्षक होऊन गेले, पण यांच्याच जन्मदिनी शिक्षक दिन का बरे साजरे करतात?तर आपल थोडक्यात यांच्या जीवन कार्याविषयी जाणून घेऊ या.
सडसडीत देहदृष्टी;बंद गळ्याचा कोट,सोनेरी काड्यांचा चष्मा,शुभ्र फेटा परिधान केलेला चालता -बोलता विश्वकोश म्हणजे भारताचे दुसरे राष्ट्रपती थोर तत्त्वज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण होय. ते एक थोर तत्त्वज्ञ,शिक्षक होते.मनात जिद्द असेल,डोळस प्रयत्न असतील तर सामान्य शिक्षक होते.मनात जिद्द असेल,डोळस प्रयत्न असतील तर सामान्य माणूसही असामान्य होऊ शकतो.संपूर्ण विश्व आपल्या कवेत घेऊ शकतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण हे आहेत.उत्तम चरित्र.बुद्धिमत्ता.अपार सहिष्णुता आदी प्रभावी वक्तृत्व यांमुळे त्यांना जगभर विलक्षण लोकप्रियता मिळाली.शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामिळनाडू प्रांतातील निरुत्ताणी या छोटाश्या गावात मध्यमवर्गीय,सात्त्विक श्रद्धाळू,धार्मिक,ब्राम्हण कुटुबांत झाला.त्यांचे शालेय ज्ञान, अफाट स्मरणशक्ती,वाचनाची प्रंचड आवड व शिकण्याची जबरदस्त ओढ असल्याने वयाच्या विसाव्या वर्षी ते एम.ए.झाले त्यांनी मद्रास येथील प्रेसींडेन्सी कॉलेज.कलकत्ता विद्यापीठ आणि त्याच बरोबर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्येही प्राध्यापक पदावर काम केले.
केवळ बौद्धिक धडाडी म्हणजे शिक्षण नव्हे,मनुष्यांची बुद्दी हृद्य आणि आत्मा यांच्या विकासालाच डॉ.राधाकृष्णन शिक्षण म्हणत.शिक्षणाचे ध्येय कोणते असावे याबद्दल ते म्हणतात,नागरिकामध्ये नैतिक जबाबदारीची जाणीव करून देऊन त्यांना सुस्कृंत नागरिक बनविणे हे शिक्षणाचे ध्येय होय.यासाठी आत्मिक विकास साधणे हा शिक्षणाचा आद्य हेतू आहे.
डॉ.राधाकृष्णन यांच्या मते,वंश आणि संस्कृती यांचा प्रभाव असलेल्या मानवजातीच्या प्रवृत्तीचे आकलन करून घेण्याचा मानवी प्रयत्नांस तत्त्वज्ञान असे म्हणता येईल.शरीर,मन व आत्मा यांचा सुंदर मेळ असलेल्या मानवी व्यक्तिमत्त्वाची सुवव्यस्था लावणे हे तत्त्वज्ञांचे कार्य आहे.शिक्षण म्हणजे जगण्याच्या कलेचे शिक्षण असले पाहिजे सौंदर्य आणि कलारसग्रहण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.शिक्षणाने मुलांची सर्जनशीलता आणि सौंदर्याचे रसग्रहण करण्याची क्षमता वृध्दीगंत करणारी साधणे व संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.शिक्षण आणि संस्कृती यांचा घनिष्ठ संबध आहे.शरीर,मन व आत्मा यांचा विकास नीट करता येणे म्हणजे संस्कृती .सर्वप्रथण मनुष्याच्या मनात बदल झाला पाहिजे.खरी सामाजिक सुधारणा मनोसंस्कृतीवरुन आकार घेत असते म्हणून शिक्षणाने चारित्र्य निर्मिती केली पाहिजे.नैतिक शिक्षण ही काळाची गरज आहे.नैतिक शिक्षण पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत दिले पाहिजे.श्रद्धा,निष्ठा,प्रेम,त्याग ,सेवा,दया ,क्षमा,शांती,मानवता इ.मूल्ये शास्वत आहेत.शालेय वातावरणात प्रेम प्रतिष्ठा आणि पावित्र्य यांचा प्रत्यय आणून देण्यासाठी शिक्षकाला खूप कष्ट घ्यावे लागतील तेव्हाच विद्यार्थीचे जीवन आनंदमय,कृतार्थ आणि यशस्वी होईल.
सतत चाळीस वर्षे अध्यापन करणारे डॉ.राधाकृष्ण खèया अर्थाने आदर्श शिक्षक आहेत.आज जिल्हास्तरावरून तर राष्ट्रीयपातळी पर्यंत शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाèया शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात येत आहे. शिक्षक हा एका कुभांराप्रमाणे असून कुंभार ज्याप्रमाणे ओल्या मातीला आकार देऊन सुंदर ,सुबक भांडी तयार करतो त्याचप्रमाणे शिक्षक सुध्दा अगदी बालवयापासून विद्याथ्र्यांच्या मनावर संस्कार घडविण्याचे त्यांना आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षकांना करावे लागते.आम्ही शिकवतो याकडे कदाचित विद्यार्थी लक्ष देणार नाही,पण आपल्या अध्यापनात जो आदर्श त्यांंंच्यासमोर ठेवतो त्याकडे विद्याथ्र्यांचे पूर्ण लक्ष असते.शिक्षकाचे आचरण पाहण्यासाठी डोळे व वचन ऐकण्यासाठी कान नेहमी तत्पर असतात.
आजच्या दिनी अशा थोर व्यक्तीचा जन्म झालेला आहे.अशा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चरणी शतशा प्रणाम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा
ङ्कविद्यार्थी हे दैवत माझे,शाळा हे मंदिर असे
सदैव त्यांना उन्नत करणे,हा माझा नित्यधर्म असेङ्क

सौ.जयश्री नीलकंठ शिरसाठे(मुख्याध्यापिका)
जि.प.प्राथ.शाळा कटंगीटोला
पं.स.गोंदिया,जि.गोंदिया