जिल्ह्यातील १२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0
11

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा आज
गोंदिया:दि.४-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा जिल्ह्यातील शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली.परंतु या आदर्श शिक्षकांची आदी निवड होईल हे कसे.५ सप्टेंबर शिक्षक दिन येऊन ठेपलेला असतांना ४ सप्टेंबरच्या सायकांळी निवड झालेल्यांची यादी जाहीर करण्यात आली.जेव्हा की विदर्भातील अन्य जिल्ह्यात हीच यादी एक दिवस आधी जाहीर करण्यात आल्याने गोंदियात शिक्षक निवडतांना किती राजकारण चालले असले याचा आभास होतो.त्यातच विशेष म्हणजे जो शिक्षकाने नेतागिरीशिवाय आणि शिक्षक संघटनेच्या प्रमुख पदाशिवाय काहीच केले नाही,अशानाही आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.त्यात निवड समितीने काय बघितले त्यांनाच ठाऊक अशी म्हणण्याची वेळ आली आहे.सोबतच प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील असमन्वयाचा प्रभाव सुध्दा निकाल जाहीर करण्यावर पडल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त गौरान्वित करण्यात येणा-या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा आज जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पि.जी. कटरे यांनी केली. जिल्ह्यातील १२ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्राथमिक विभागात आज माध्यमिक विभागातील तीन व सावित्री बाई फुले विशेष पुरस्काराकरिता एका शिक्षिकेची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये गोंदिया पंचायत समितीमध्ये अनिरुद्ध मेश्राम, गोरेगाव पंचायत समितीच्या कु. सुर्यकांता हरिणखेडे, तिरोडा प.स.चे महीपाल पारधी, सडक/अर्जनी प.स. भास्कर नागपूरे, अर्जुनी/मोरगाव पं.स. चे पुणाराम जगझापे, देवरी पंस.चे दीपक कापसे, सालेकसा पं.स. चे रंजित मच्छिरके, आमगाव प.स.चे कुवरलाल कारंजेकर, हे प्राथमिक गटातून तर माध्यमिक विभागातून नवेगावबांध जि.प. हायस्कूलचे राजेंद्र बावनकर, जि.प. हायस्कूल ककोडीचे रवींद्र मेश्राम, आणि जि.प. हायस्कूल साखरीटोलाचे विनोद झोडे, यांच्यासह सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कारासाठी दीक्षा फुलझेले या शिक्षिकेचे निवड करण्यात आली आहे. उद्या आयोजीत शिक्षक दिन समारंभाला सर्व शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कारासाठी मोठ्याप्रमाणात राजकारण झाल्याची चर्चा आहे.तर काही प्रस्तावांना निवड समितीने बघितलेच नसल्याचेही बोलले जात आहे.