ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र वानखेडे यांचे निधन

0
9

नागपूर,दि.९ -ज्येष्ठ पत्रकार व देशोन्नतीचे शहर संपादक देवेंद्र वानखेडे यांचे वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर गेल्या आठवड्याभरापासून उपचार सुरू होते. मंगळवार ८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पार्थिवावर बुधवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता वर्धा येथील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्‍चात पत्नी कवयित्री सुनीता झाडे-वानखेडे, मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.