सर्वधर्मसमभाव जपणारा सण पोळा

0
20

शेतक-यांसाठी महत्वाचा सण असलेला पोळा आज संपूर्ण विदर्भात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतक-यांवर कितीही संकट आली तरीही त्यांच्या जिवाभावाचा साथी असलेल्या बैलाचा हा उत्सव साजरा करण्यात बळीराजाने कुठलीही कमी पडू दिली नाही. या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह होता. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करताना दिसले.आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील महत्वाचा घटक असलेला मुक्या जनावराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि शेतकरी बांधवांना वर्षभर मोलाची साथ देणाऱ्या बैलांचा सण पोळा