मेंदीपूर येथे २0 महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण

0
13

गोंदिया दि:१६-: अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे ग्रामीण भागात विविध विकासात्मक दृष्टीकोनातून कार्यक्रम राबविते. महिलांना रोजगाराभिमुख करण्यासाठी २0 महिलांना नि:शुल्क शिवणकला प्रशिक्षण मेंदिपूर येथे देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचे उद््घाटन करण्यात आले.
अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारे संचालित या प्रशिक्षण केंद्राला तांत्रिक शिक्षण, जन शिक्षण संस्थान गोंदिया यांच्या मार्फत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्राचा कालावधीत सहा महिन्याचा राहणार आहे. एका बॅचचा कालावधी संपल्यावर दुसरी बॅच पुन्हा सुरू करण्यात येईल. एका बॅचमध्ये एकूण २0महिला प्रशिक्षण घेणार आहे. या शिवणकला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यामागचा मुख्य हेतू महिला सबलीकरण हे आहे. ग्रामीण भागातील महिला रोजगार करून आपले नियमित जिवन जगतील यासाठी खटाटोप आहे.
या शिवणकला केंद्राचे उद््घाटन अदानी पावर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे प्रमुख सी.पी.साहू यांनी केले.या प्रशिक्षणामुळे महिला रोजगार करू लागतील. महिलांच्या मार्गदर्शनाखाली घर चालतो. आपल्या घरात चांगल्या सवयी लावण्याचे कार्य ती योग्यरितीने करु शकते. गुटखा, तंबाखू, दारू या व्यसनापासून आपल्या परिवाराच्या मुक्ततेकरीता ती नक्कीच धडपड करून आपल्या कुटूंबात आर्थिक व शारीरिक सुदृढता आणू शकते असे मत साहू यांनी व्यक्त केले. प्रस्तावना अदानी फाऊंडेशन तिरोडाचे प्रकल्प समन्वयक सुबोधकुमार सिंग यांनी केले.
जनशिक्षण संस्थेचे संचालक लक्ष्मीप्रसाद सामंतराय यांनी अदानी फाऊंडेशनचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य प्रदीप मेश्राम होते. प्रमुख अतिथी मोहन पांडे, नितीन पाठक,सुबोध सिंग, लक्ष्मीप्रसाद सामंतराय, विनायक डोंगरवार, समसुन निशा पठान, सरपंच मुक्ता रहांगडाले, सचिव फटिंग, भोजेश्‍वर बारसागडे, शिवदास पारधी, बेनू मारबदे, इंदिरा चौधरी उपस्थित होते. संचालन कैलास रेवतकर व आभार पूजा जमईवार यांनी मानले.