कुरूप बालके सुंदर होऊन परतणार

0
10

गोंदिया दि:१६-: : जन्मत:च फाटलेले ओठ व टाळू असलेल्या ३३ युवक, युवती व बालकांची निवड युवा जागृती संस्थेद्वारे नि:शुल्क प्लास्टिक सर्जरीसाठी करण्यात आली.या बालकांवर पांढर रूग्णालय बैतुल (मध्य प्रदेश) येथे सर्जरीसाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर छोटेखानी कार्यक्रम घेऊन रवाना करण्यात आले.
संस्थाध्यक्ष गोपाल अग्रवाल, नरेश अग्रवाल, मेहबूब हिरानी, सोनू सावंत, विजय बजाज व डॉ. विकास जैन यांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.सर्व रूग्ण व त्यांचा एक नातलग यांना बैतूल स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी हलवाई हॉटेल असोसिएशनच्या वतीने रेल्वे तिकिटे देण्यात आलीत.सर्व बालकांवर र्जमनी व स्वीडन येथूल आलेले चिकित्सक डॉ. थामस, डॉ. लॅम्ब्रेक्ट यांची चमू शस्त्रक्रिया करणार आहे.