६३ पोलीस पाटील जागांसाठी ५0५ उमेदवार इच्छूक

0
23

देवरी, दि:१६- आमगाव, सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी या चार तालुक्यातील ६३ पोलीस पाटील पदांच्या जागेसाठी ५0५ अर्ज करण्यात आले. त्या उमेदवारांची परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे. या पोलीस पाटीलपदाची परीक्षा १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३0 ते २.३0 या काळात सिता पब्लिक स्कुल चिचगड रोड देवरी येथे घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी १३ ऑक्टोबर रोजी संबंधीत गावाच्या तलाठय़ांकडे प्रवेशपत्र पाठविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना प्रवेश पत्र मिळाले नाही त्या उमेदवारांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय देवरी येथे संपर्क साधावा व परीक्षेच्या एक तासापूर्वी परीक्षास्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे.