विद्यार्थीनीला त्रास देणारा ‘तो’ शिक्षक निलंबित

0
7

भंडारा दि:१६-: कोका येथील वनवैभव आदिवासी आश्रमशाळेतील इंग्रजी विषयाचा सहाय्यक शिक्षक युवराज भैसारे शाळेतीलच अकरावीत शिकत असलेल्या मुलीला सहा महिन्यांपासून त्रास देत होता. शिक्षकाचा हा प्रकार असह्य झाल्याने या विद्यार्थीनीने उघडकीस आणून या शिक्षकाविरुध्द कारवाईची मागणी केली.
या प्रकरणाची दखल घेत आदिवासी प्रकल्प अधिकारी ह.मा. मडावी यांनी तत्काळ आदेशाने सदर शिक्षकाला १४ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्याचे आदेश दिले. भंडारा तालुक्यातील कोका येथील वनवैभव आदिवासी आश्रमशाळेतील इंग्रजी विषयाचा सहाय्यक युवराज भैसारे हा शाळेतील एका विद्यार्थीनीला मागील सहा महिन्यापासून त्रास देत होता. त्याचा त्रास सतत सुरु असल्याने मुलीला तो असह्य वाटत होता. पीडित मुलगी दहावीतून अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतरही त्याचा हा त्रास सुरुच होता. दरम्यान सुटी घेऊन ही मुलगी घरी गेली असता तिने हा किळसवाणा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी आदिवासी संघटनेच्या पदाधिका-यांसोबत १४ ऑक्टोबर रोजी ही तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने ही माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी मडावी यांना सांगितली त्यांनी तत्काळ प्रभावाने सदर शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले.