चुलोद आश्रमात भजन, कीर्तन

0
16

गोंदिया : परमसंत बलजीतसिंह महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त विश्‍वमानव रुहानी केंद्र चुलोद आश्रममध्ये सोमवारी भजन, कीर्तन घेण्यात आले. सकाळी ९ ते १0 वाजता शब्द गान, १0 ते ११वाजता ध्यान भजन व ११ते १२ वाजता स्क्रीन वर महाराजचा सत्संग झाला.वाढदिवसानिमित्त नामदान व लंगर ठेवला होता. विश्‍व मानव रुहानी केंद्रात पुरूषोत्तम मोदी, तेजलाल धामने, राजू बिसेन, लखन मिश्रा, घनश्याम नायखाने, सचिन पटले, कमलेश शाहू, झनकलाल रहांगडाले, सीमा बिसेन, ललीता पारधी, सुरेश पुरी, भुरेलाल ठाकरे, नीला डडेवार, भोजराज चुटे, डॉ. किसनलाल बघेले, भागवत ठाकरे, हेतराम नागपुरे, शिवाजी तिवडे, खुमराज ठाकुर यांचा सहभाग होता.