‘मोहफूल’ प्रकल्प उभारण्यास सहकार्य करू

0
7

गोंदिया दि,24:: गोंदिया जिल्ह्यात मोहफूल प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी वन विभागामार्फत सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. या प्रकल्पाबाबत सविस्तर अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्याचे निर्देश वित्त आणि नियोजन व वनमंत्नी सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. नागपूर येथील वन सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार संजय पुराम, वन विभागाचे सहसचिव प्रकाश महाजन, मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) ए.एस.के. सिन्हा, नागपूरचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी, गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, माजी आमदार भेरिसंह नागपुरे व केशवराव मानकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गजेंद्र भारती, उप-वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यात मोहफुले सहजपणे उपलब्ध होतात. त्यामुळे मोहफुलांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादने घेतली गेल्यास त्याचा फायदा होईल. गोंदिया जिल्ह्यात कोणता मोहफूल प्रक्रि या प्रकल्प उभारता येईल व त्याद्वारे कोणत्या उत्पादनांची निर्मिती करता येईल, याचा अभ्यास व्हावा. तसेच हा प्रकल्प कोणत्या विभागामार्फत चालविला जाणार, हे निश्‍चित करावे. 
यासाठी जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रकल्पाचा एकित्रत आराखडा तयार करावा, अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या.