रक्तदानानाने कृतज्ञता दिवस साजरा

0
10

सालेकसा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे अमृत महोत्सवी वर्ष तालुका राष्ट्रवादीतर्फे बसस्टॉप सालेकसा येथे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी हरिणखेडे, बबलू कटरे आणि ब्रिजभूषण बैस यांनी मार्गदर्शन केले. अतिथी म्हणून सरपंच योगेश राऊत, पोलीस पाटील राजेंद्र बागळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव फुंडे, गोंदिया शहर अध्यक्ष शिव शर्मा, माजी सभापती तुकाराम बोहरे, माजी उपसभापती मनोज विश्‍वकर्मा, तालुकाध्यक्ष प्रभाकर दोनोडे उपस्थित होते. संचालन मनिष पुसाम यांनी केले. आभार निर्दोष साखरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दौलत अग्रवाल, रविंद्र चुटे, सुरेश मच्छिरके, अभिषेक चुटे, संतोष रहांग़डाले, रमेश चुटे, मनोज शिवणकर, जितेश राणे, निकेश गावड, कैलास धामळे, ओमप्रकाश पारधी, निर्मल मोहजारे, ढालचंद मोहारे, बनोठे, घनशाम कटरे, मयूर चुटे, रविंद्र कटरे, रघुदास नागपुरे, दिलीप पटले, पप्पु पटले, बाळकृष्ण शेंडे, चत्रूदास मोहबे, हिरा उईके, बालमुकुंद शेंडे, रामकृष्ण उपराडे, सोभाराम शहारे, महेंद्र तिरपुडे, अश्‍विन जनबंधू, धीरज टेंभुर्णीकर व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. याप्रसंगी रक्तदात्यांना सावलराम बहेकार, डॉ. ठाकूर, डॉ. गौतम, राजू जैन, विनय शर्मा आणि कावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.