प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचे दर वाढणार-किशोर तरोणे

0
12

अर्जुनी-मोरगाव दि,24::: अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचे दर वाढणार असल्याचे खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी कळविले आहे.
तालुक्यात अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना इटियाडोह-गोठणगाव तलावावर बनली आहे. त्याद्वारे अर्जुनी-मोरगावसह १५ गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. सदर योजना जि.प. गोंदियाद्वारे खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाच्या माध्यमाने चालविल्या जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्युत बिलात झालेली ३0 टक्के वाढ व मजुरांचे वाढलेले वेतन यामुळे ८0 रूपये प्रतिमहिना होणार्‍या वसुलीनुसार मंडळाला रसायन, किरकोळ दुरूस्ती, मजुरांचे वेतन तसेच इतर खर्च भागविणे अवघड झाले आहे. प्रत्येक महिन्याला मागणी एक लाख आठ हजार ४८0 रूपये व विद्युत बिल सोडून इतर खर्च अंदाजे एक लाख २५ हजार रूपये प्रत्येक महिन्याला खर्च येत आहे. त्यामुळे प्रत्येक कनेक्शन धारकाकडून १ एप्रिल २0१६ पासून १00 रूपये प्रतिमहिना वसुली केल्या जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी कळविले आहे.
सदर योजनेमध्ये गोठणगाव, रामनगर, प्रतापगड, बोंडगाव, गंधारी, सुरबन, करोडली, मोरगाव, निलज, मालकंडपूर, माहुरकुडा, अर्जुनी, ताडगाव, झरपडा, बुधेवाडा अशा १५ गावातील जनतेवर पिण्याच्या पाण्याचा अधिभार पडणार आहे