खेळ विद्याथ्र्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक : आमदार जैन

0
11

तिरोडा,दि. ४ : विद्याथ्र्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, हाच शिक्षकांचा उद्देश असतो. त्यामळे पुस्तकी ज्ञानासोबत खेळांतून शारिरीक विकास महत्त्वपूर्ण आहे, असे सांगत आमदार राजेंद्र जैन यांनी खेळ विद्याथ्र्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे मत व्यक्त केले.

नगर परिषदेच्या वतीने डॉ. छत्रपती दुबे प्राथमिक शाळेच्या पटांगणात तालुका क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार जैन बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले तर, प्रमख अतिथी म्हणून माजी आ‘दार दिलीप बनसोड, नगराध्यक्ष अजय गौर, पंचायत समिती सभापती उषा िकदरले, जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे, कैलास पटले, राजलक्ष्मी तुरकर, प्रिती रामटेके उपस्थित होते.
आमदार जैन म्हणाले, ७७ वर्षांपासून स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची ही परंपरा अखंड सुरू आहे. या परंपरेला पुढेही जीवंत ठेवण्याकरिता कोणत्याही पक्षाने भेदभाव न करता एकत्र येऊन सहकार्य करावे.
कार्यक्रमाला रजनी कुंभरे, सुनीता मडावी, पंचायत समितीचे उपसभापती किशोर पारधी, नगर परिषदेच्या उपाध्यक्ष ममता बैस, सभापती अर्चनादेवी जायस्वाल, पंचायत समिती सदस्य जया धावडे, निता रहांगडाले, प्रदीप मेश्राम, संध्या गजभिये, माया भगत, नत्थू अंबेले, माया शरणांगत, मनोहर राऊत उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, कर्मचारी व पंचायत समितीच्या कर्मचाèयांनी सहकार्य केले.