बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा

0
7

नवी दिल्ली- बैलगाडा शर्यती सुरू होण्या संदर्भातील नोटीफिकेशन ऑर्डरवर केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी आज सही केली असून येत्या आठ-दहा दिवसांत बैलगाडा शर्यती सुरू होतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
खासदार आढळराव पाटील म्हणाले की, युतीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर सर्वप्रथम मी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन बैलगाडा शर्यतबंदीबाबतची सर्व परिस्थीती व बैलगाडा शर्यतींचे पारंपारिक मह्त्व निदर्शनास आणून दिले. श्री. जावडेकर यांच्या दालनामध्ये वेळोेवेळी बैठका घेतल्या. तसेच शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळासह यासाठी पाठपुरावाही केला. त्यानंतर दि. 16 जुलै रोजी लोकसभेतील अर्थसंकल्पीय भाषणावेळी बैलगाडा शर्यती सुरू करण्याचा मुद्दा प्रबावीपणे मांडला होता. संपूर्ण देशातील खासदारांमधून पहिल्यांदाच संसदेमध्ये बैलगाडा शर्यतींच्या मुद्यावर प्रश्न मांडणारा खासदार म्हणून मला बहुमान प्राप्त झाला. त्यानंतर बैलगाडा शर्यतीं सुरू होण्याच्या कामांना वेग आला.
आज केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांची व माझी समक्ष चर्चा झाली. यावेळी श्री. जावडेकर यांनी बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतचे आपण नोटिफिकेशन काढले असल्याचे सांगून प्रस्ताव विधी विभागाकडे मंजूरीसाठी पाठविल्याची माती दिली. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत या प्रस्तावास मंजूरी मिळून बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग सुकर होईल अशी माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या हक्काच्या लढ्याला सरतेशेवटी यश आले असून हे केवळ माझ्या एकट्याचे यश नसून यामागे तमाम महाराष्ट्रातील माझ्या शेतकर्यांच्या व बैलगाडा मालकांच्या भावना असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितलेे.