राष्ट्रवादी काँग्रेस पाळणार कृतज्ञता वर्ष

0
12

मुंबई-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब ह्यांच्या १२ डिसेंबर १४ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.आम्ही १२ डिसेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१५ हे वर्ष जाणत्या नेत्याचे अमृत महोत्सवी वर्ष ‘कृतज्ञता वर्ष’ म्हणून साजरे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कायार्लयात आयोजित पत्रकार परिषदेते ही माहिती दिली.त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलीक हे सुध्दा उपस्थित होते.
आमची भूमिका राज्याला स्थिर सरकार देण्याचीच होती. आता सेना-भाजप एकत्र आल्यामुळे राज्याला आपोआपच स्थिर सरकार मिळतय,याचा आम्हाला आनंद आहे.सेना-भाजप एकत्र निवडणूक लढवत होती तरीही दोन्ही सभागृहात विरोधी नेते पद संख्याबळावर भाजपकडेच होतं.महिनाभर विरोधीनेते पक्षनेतेपद सांभाळून सत्तेत सामील होणे म्हणजे लोकशाहीची चेष्टा आहे.सभागृहात पहिल्या दिवसापासूनच आम्ही विरोधी बाकावर बसलो होतो. स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही सकारात्मक होतो तरी राज्यातील प्रश्न विरोधी बाकावर बसून आक्रमकपणे मांडणार असल्याची भावना आम्ही वेळोवेळी बोलून दाखवली आहे.
मागच्या महिनाभरात दोन पक्षांनी एकमेकांवर ज्या असभ्य भाषेत टिका केलेली आहे. त्यामुळे त्यांचा नवा संसार कसा चालेल, हे येणारा काल ठरवेल.
चार दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राकाँपाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना आठ दिवसात उपायोजना करण्याचे निवेदन दिले आहे. त्यावर उपाययोजना न झाल्यास अधिवेशनात त्याविरोधात आम्ही आवाज उचलणार आहोत.
केळकर समितीचा अहवाल माजी मुख्यमंत्र्यांना सादर झाला होता. त्यामुळे त्यात काय आहे, याबाबत आम्हाला कल्पना नाही. अहवाल सभागृहात आल्यावरच त्यावर बोलू असेही तटकरे म्हणाले.