हळदी कुंकूच्या माध्यमातून “बेटी बचावो – बेटी पढावो” ची जनजागृती

0
13

गोंदिया-मकरसंक्रांतीच्या पर्वावर तिळगुळ वाटप करून नाते स्नेह वृद्धिगत केले जात असल्याची परंपरा आहे. विवाहित स्त्रिया या पर्वावर घरोघरी जाऊन तिळ गूळ देऊन हळदी कुंकू लावुन सौभाग्य वाण देतात. सद्यस्थितीत ऑफिस कार्यालयातील महिलांना घरोघरी जाणे शक्य होत नाही. अशा प्रसंगी स्त्रिया कार्यालयातील मधल्या वेळेत हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करून वाण देवून हा सणं साजरा करीत असतात.
जिल्हा परिषद गोंदिया येथील आरोग्य विभागातील महिलांनी हळदी-कुंकू च्या माध्यमातून “बेटी बचावो- बेटी पढावो” या अभियानाची अनोखी जनजागृती करून लक्ष वेधले आहे. सर्व स्त्रियांनी एकत्रित येऊन कार्यालयात मधल्या वेळेत राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे “बेटी बचावो – बेटी पढावो” अभियानाची प्रतिज्ञा घेण्यात आली .वाण म्हणून कुंडीत लावलेले रोपे व घरगुती साहित्य एकमेकांना देण्यात आले. याप्रसंगी योगिता हटोलकर ( शेंडे), प्रतिभा दरवडे(भदाडे), प्रेमलता बागडे, उषा तुरकर,मंजु रहांगडाले, मनीषा देशमुख, कल्याणी चौधरी, वैशाली उके,लिल्हारे, सोनवणे ई. कार्यालयातील महिलांनी सहभाग घेऊन नाविन्यपुर्व उपक्रम साजरा केला.