कमिटी गठित :अल्फा व डेंडूचा शोध सुरू

0
15

गोंदिया : केंद्र शासनाद्वारे गठित एनटीसीए (नॅशनल टायगर कंझर्वेशन एडमिनिस्ट्रेशन) द्वारे नागझिरा अभयारण्यात बेपत्ता वाघीन अल्फा व वाघ डेंडू यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सध्या नागझिरा अभयारण्यात पर्यटकांना केवळ अल्फाची मादा संतान टी-४ आपल्या दोन छाव्यांसह दिसत आहे.
केंद्र शासनाने वाघांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एनटीसीएची स्थापना केली आहे. गोंदिया जिल्ह्यात वाघांवर नजर ठेवण्यासाठी तीन सदस्यीय कमिटी गठित करण्यात आली आहे. यात सेवानवृत्त डीएफओ अशोक खुने, वनमित्र सावन बहेकार व वनमित्र राजकुमार जोब यांचा समावेश आहे. सदर तिन्ही सदस्यांचा उद्देश्य मागील वर्षापर्यंत नागझिरा अभयारण्यात दिसणार्‍या अल्फा वाघीन व तिच्या दोन छाव्यांचा शोधून काढणे आहे. तसेच सदर तिन्ही सदस्य नागझिरा येथील डेंडू वाघालासुद्धा शोधणार आहेत.