सोनिया व राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपूरात सभा

0
9
नागपूर, दि. १ – अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी नागपुरात डॉ.बाबासाहेब आंबेfडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी येणार आहेत. काँग्रेस पदाधिका-यांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार दुपारी ३ वाजता विमानाने सोनिया व राहुल गांधी यांचे नागपुरात आगमन होईल.
दुपारी ४ वाजता ते दीक्षाभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करतील.त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कस्तुरचंद पार्क येथे आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करतील. सभेच्या तयासाठी आज, शुक्रवारी नागपुरात अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस द्विग्वीजय सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मॅराथॉन बैठका घेतल्या.