गुदम्यात 13 जोडपी विवाहबध्द ;प्रयास सामाजिक संस्थेच्या स्तुत्य उपक्रम

0
9

गोंदिया- तालुक्यातील गुदमा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात बुधवार(दि.20)ला पार पडलेल्या सर्वजातीय सामुहिक विवाहसोहळ्यात 13 जोडपी विवाहबध्द झाली.प्रयास सामाजिक संस्थेच्यावतीने यावर्षी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आबेंडकर यांच्या 125 व्या जंयती समारोहाच्या निमित्ताने तसेच नागरिकांमध्ये मुलीचे महत्व पोचविण्याचे उद्देशाने बेटी बचाव संदेश देत प्रयास शुभमंगल सर्वजातीय सामुहिक विवाह समारोह समिती गुदमाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे वैशिष्टय म्हणजे कार्यक्रमाच्या आयोजनापासून ते समारोपापर्यंतची सर्वच जबाबदारी ही महिलांनी पार पाडली.विशेष म्हणजे लग्नाची मंगलाष्टके म्हणण्याचे कामही महिलेनीच केले.कार्यक्रमाची सुरवात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन करण्यात आली.कार्यक्रमाला आजुबाजुच्या परिसरातील पाच हजाराच्यावर नागरिक मंडळीनी सहभाग नोंदविला होता.13 जोडप्यांना समितीच्यावतीने भेटवस्तु देण्यात आले तसेच जेवणाची सोय सुध्दा उत्तमपणे करण्यात आली होती.मंडपाच्या परिसरात बाबासाहेबांचे विचार आणि मुलीचे महत्व सागंणारे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.विवाहसोहळ्याला माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल,माजी सभापती जगदिश बहेकार,सविता बेदरकर,अॅड.वसंत चुटे,सरपंच विजय मुनेश्वर,ओबीसी संघर्षकृती समितीचे सचिव व बेरार टाईम्सचे सपांदक खेमेंद्र कटरे,सकाळचे जिल्हा प्रतिनिधी सावन डोये,ओबीसी संघर्षकृती समितीचे सघंटक कैलास भेलावे,आयोजक समितीचे मुख्य मनोज मेंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विवाहसोहळ्याचे प्रास्तविक सयोजिंका व माजी जि.प.सभापती लक्ष्मीताई मनोज मेंढे यांनी केले. आयोजनासाठी अध्यक्षा वनिता वाढई, उपाध्यक्ष सीमा गायधने, सुग्रता शिवणकर, सचिव ममता साऊसकर ,सदस्या लिलावती पाथोडे, प्रतिमा फुले, शिला भाकरे, धनवंता ब्राम्हणकर, नंदा वाढई, सरिता जगने, भुमिका मुंडे, प्रज्ञा गणवीर, राधिका गायधने, मंदा तरोणे, शोभा पटले, गीता पारधी, कुसूम खवासे, लिला मेढे यांच्यासह इतर महिलांनी परििश्रम घेतले.