२१ एप्रिलला अॅड.श्रीहरी अणे यांचे ब्रम्हपुरीत व्याख्यान

0
10

ब्रम्हपुरी: राज्याचे माजी महाअधिवक्ता व प्रखर विदर्भवादी नेते अॅड.श्रीहरी अणे यांचे ब्रम्हपुरी येथे २१ एप्रिलला स्वतंत्र विदर्भाच्या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

‘मी विदर्भ बोलतोय’ असे या कार्यक्रमाचे शीर्षक असून, २१ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे चौकातील पंचशील वसतिगृहाच्या पटांगणावर हा कार्यक्रम होणार आहे.

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक अॅड.वामनराव चटप, विदर्भ राज्य समन्वय समिती तथा जनमंचचे अध्यक्ष अॅड.अनिल किलोर, श्रीकांत तराळ, नितीन रोंगे, किशोरसिंह बैस, अॅड.नंदा पराते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अॅड.गोविंद भेंडारकर, सुधीर सेलोकर, सुखदेव प्रधान, अशोक रामटेके, अर्चना बगमारे यांनी केले आहे.