केंद्राचे दुष्काळी पथक रविवार पासून राज्याच्या दौऱ्यावर-ना.दानवे

0
16

औरंगाबाद – राज्यातील खरीप पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा विविध मंत्रालयाच्या जेष्ठ अधिकाऱ्यांचे पथक दिनांक १४ ते १७ डिसेंबर दरम्यान राज्यातील विविध दुष्काळी स्थितीचा मराठ वाडा आणि विदर्भ परी सरा चा प्रातिनिधिक स्वरुपात पाहणी दौरा करणार आहे. या भेटीत मराठवाडा ते विदर्भ दरम्यान दहा अधिकाऱ्यांची दोन पथके दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करुन आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करतील.

औरंगाबाद येथे सुरवातीला राज्याचे पुनर्वसन सचिव आणि मराठवाडा विभागीय आयुक्तांसोबत मराठवाडा तसेच राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेऊन दोन दिवस प्रत्यक्ष पाहणी दौरा करून तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांसोबत केंद्रातील अधिकारी चर्चा करणार आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने राज्याचा या परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत मिळू शकते असे राज्यमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.

केंद्रीय कृषी विभागाच्या लघु कृषक कृषी व्यापार संघ (एस.एफ.ए.सी.) या विभागाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली वित्त, नियोजन आयोग, पाणीपुरवठा स्वच्छता, ग्रामीण विकास, उर्जा, जलसंधारण मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, पिक विभाग इत्यादी विभागांच्या अधिकाऱ्यांची दोन पथके सोमवारी औरंगाबाद, बीड, येडशी, लातूर, आणि दुसरे पथक औरंगाबाद, जालना, मेहकर, वाशीम, अकोला, अमरावती तर मंगळवारी पहिले पथक लातूर, अंबेजोगाई, गंगाखेड, अमरावती, यवतमाळ, पुलगाव व दुसरे पथक परभणी, अर्धापूर, उमरेड, यवतमाळ अशी दुष्काळी भागाची पाहणी करतील बुधवारी दोन्ही पथके यवतमाळ ते नागपूर आणि वर्धा ते नागपूर असा प्रवास करून मुख्यमंत्री व मुख्य सचिवांसोबत चर्चा करून दिल्लीकडे प्रयाण करतील.