मराठमोळी अॅक्ट्रेस मल्याळम फिल्मसाठी झाली न्यूड

0
19

11107179_1617795721772195विशेष प्रतिनिधी
मुंबई, दि. २६ – प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही.. कधी एखादा स्टंट, कधी अश्लील कृत्य, कधी अश्लील फोटो किंवा अश्लील एमएमएस यामुळं चर्चा तर होतेच.कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, मिड नाईट्स चिल्ड्रन या गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन सध्या दुस-याच एका कारणावरुन प्रसिद्धीझोतात आली आहे. एका एमएमएसमुळे तिच्या नावाची चर्चा सुरु आहे. हा एमएमएस म्हणजे ‘द पेटेंड हाऊस’ या कादंबरीवर आधारीत Chaayam Poosiya Veedu या मल्याळम सिनेमातील दृश्य असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमात नेहा महाजनने अंगप्रदर्शनाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या असल्याचं दिसून येत आहे.
या व्हिडिओत नेहा बाथरूममध्ये अंग पुसताना दिसतेय, दुसऱ्या व्हिडिओत न्यूड वॉक आहे, तर तिसऱ्या व्हिडिओत सेक्स करताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा भारतात बॅन झाला. या सिनेमातील अभिनेत्रीवर चित्रीत झालेले हे तिन्ही सीन्स वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकाला सांगितले होते. मात्र दिग्दर्शला सेन्सॉरचे म्हणणे मान्य नसल्याने या सिनेमावर भारतात बंदी घालण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री राधिका आपटे हिचे हॉट सेल्फी आणि हॉट व्हिडीओ लीक झाले होते.. राधिकानं मात्र हे व्हिडीओ आणि फोटो आपले नसल्याचा दावा केला होता. आता हा एमएमएस व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री नेहा महाजनचं काय उत्तर असेल ? की हासुद्धा एक निव्वळ पब्लिसिटीचा स्टंट तर नाही ना ?