जिल्ह्यात सरासरी ६७ मि.मी.पाऊस

0
15

गोंदिया, दि.२७ : जिल्ह्यात १ ते २७ जून २०१६ या कालावधीत २२०९.४ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ६७ मि.मी. इतकी आहे. आज २७ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७१९.२ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी २१.८ मि.मी. इतकी आहे. २७ जून रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया १८ मि.मी. (२.६) , गोरेगाव तालुका- ८३.७ मि.मी. (२७.९), तिरोडा तालुका- १२२.८ मि.मी. (२४.५), अर्जुनी मोरगाव तालुका- १५७.८ मि.मी. (३१.५), देवरी तालुका- १७९.४ मि.मी. (५९.८), आमगाव तालुका- १७ मि.मी. (४.३), सालेकसा तालुका- २६ मि.मी. (८.७) आणि सडक अर्जुनी तालुका- ११३.८ मि.मी. (३७.९) असा एकूण ७१९.२ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २१.८ मि.मी. इतकी आहे.